*माऊंट लिटरा झी स्कूल मादलापूर येथे ५१ वे तालुकास्तरीय २ दिवसीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन* उदगीर - महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांचे ५१ वे तालुकास्तरीय २ दिवसीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन उदगीर तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या उच्च प्राथ. मध्य व उच्च मा.शाळांसाठी आयोजित करण्यात आले आहे. मादलापूर येथील सर्व सुविधांनी सुसज्ज अशी व कमी काळात शैक्षणिक क्षेत्रात आपले नाव लौकीक केलेली माऊंट लिटरा झी स्कूल, मादलापूर रोड उदगीर येथे .दि.१५ व १६ /१२/२०२३ या कालावधीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन केंद्रस्तरावरील गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतिय क्रमांक प्राप्त स्तरनिहाय विद्यार्थ्यांना प्रयोगासह तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे केंद्रस्तरावर गुणानुक्रमे प्रथम क्रमांक प्राप्त शैक्षणिक साहित्यासह शिक्षकांना वरील ठिकाणी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे . या साहित्य प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ९ ते १२ नोंदणी,प्रयोग मांडणी व उदघाटन होणार आहे व दुपारी १२ ते ०५ विद्यार्थ्यांना पाहण्यसाठी प्रदर्शन खुले राहिल दुसरा दिवस सकाळी ९ ते १ विद्यार्थ्यांना पाहण्यसाठी प्रदर्शन खुले राहिल तर दुपारी १ ते ३ यावेळेत साहित्य प्रदर्शनाचे मूल्यमापन करून दुपारी -३ ते ५ बक्षिस वितरण करण्यात येणार आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी