उदगीर जिल्हा निर्मिती सद्या अश्यक्य, उदगीर परिसरातील प्रॉपर्टीचे भाव धडाम ? उदगीर:- उदगीर जिल्हा निर्माण होईल, प्रॉपर्टी चे भाव दुप्पट होतील या आशेने अनेकांनी उदगीर व परिसरात अव्वा च्या सव्वा भावाने प्रॉपर्टी टोकण रक्कम देऊन खरेदी केली खरी पण विधानसभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सद्या नवीन जिल्हा निर्मिती अश्यक्य असल्याचे सांगितल्याने उदगीर जिल्हा निर्मिती थंड बस्त्यात गेल्याने आव्वा च्या सव्वा भावाने प्रॉपर्टी खरेदी केलेल्याचे धाबे दणाणले असल्याचे चित्र दिसत असून या प्रॉपर्टी भाव धडांम कोसळतील असे जाणकारांचे मत दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी