सोमनाथपुर ग्रामपंचायतीचा अजब कारभार,महेश कॉलनी वासी परेशान उदगीर= उदगीर शहराचा उपविभाग म्हणून सोमनाथपुर असून येथील ग्रामीण पोलिस स्टेशनच्या मागे महेश कॉलोनी असून ग्रामपंचायत येथील रहिवाशांकडून मालमत्ता कर वसूल तर करते पण तेथील रहिवाश्यांनी कुठलीच सुविधा देत नाही, कचरा व्यवस्थापन नाही,साफ सफाई नाही ग्रामपंचायतीने त्वरीत या बाबी कडे लक्ष द्यावे अन्यथा येथील रहिवाश्यांना ग्रामपंचायत विरुद्ध आंदोलन करावे लागेल असे म्हणणे येथील रहिवाश्यांचे आहे 👉👉= नांदेड रोड ते महेश कॉलनी पर्यंतचा रस्ता ग्रामपंचायत ने मनरेगा अंतर्गत तयार करून वर्ष ही झाले नाहीं निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची तक्रार करून ही ग्रामसेवक, सरपंचाने त्याचे बिल काढले या बाबत बिल काढणाऱ्या ग्रामसेवक, सरपंचावर कार्यवाही साठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार ला सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी