महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मिती सद्या अश्यक्य:- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उदगीर:- महाराष्ट्रात नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा सध्या कोणताही विचार नाही. मात्र, काही तालुक्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नव्या जिल्हानिर्मितीचा मुद्दा रेटला. गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवा जिल्हा करण्याची घोषणा दोनदा झाली. चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाचाही प्रस्ताव होता. मात्र, काहीही झाले नाही. तालुके जास्त आहेत. जिल्हे कमी आहेत. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती बघता नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची वडेट्टीवार यांनी मागणी केली. नाना पटोले यांनीही नवीन जिल्हानिर्मितीचा मुद्दा मांडला. यावर उत्तर देताना विखे पाटलांनी जिल्ह्याच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी उद्भवतात. पैसाही भरपूर लागतो. त्यामुळे हा विषय सध्या सरकाच्या धोरणात नसल्याचे स्पष्ट केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी