*पत्रकारांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील, एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन* 👉माहूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांचा मेळावा उत्साहात *उदगीर:* 'मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाही. जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील, आह्मी त्या सरकारच्या सोबत आहे. पण जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नाही, आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आह्मी लढा सुरूच ठेवू,' असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळावा शनिवारी, (१३ जानेवारी २०२४) नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड येथे उत्साहात पार पडला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव केराम, स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर, माहूर नगर पंचायत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख, नांदेड भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे, माहूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजी त्रिपाठी, मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, टीव्ही असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, डिझिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभाग विभागीय संघटक प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियाणी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, माहूर तालुका मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी उदगीर चे सचिन शिवशेट्टे, सुरेश पाटील नेत्रगावकर श्रीनिवास सोनी, विश्वनाथ गायकवाड यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी, पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते. देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितले की, 'सरकार कुठल्याही असले तरी पत्रकारांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असाच आहे. सरकारच्या पेन्शन योजनेबाबत नेहमी हे दिसून येते. पत्रकारांना पेन्शन देताना सरकार त्यांच्याकडे बजेट नसल्याचे नेहमीच सांगते. त्यामुळे आता पत्रकारांच्या पेन्शनसाठी सरकारने अर्थसंकल्पातच तरतूद करावी, अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायदा झाला, पण तो कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आलेला नाही. कारण या कायद्याचे नोटिफिकेशनच अद्याप निघाले नाही. ही सरकारने एक प्रकारे पत्रकारांची केलेली फसवणूकच आहे. पत्रकार संरक्षण कायद्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ,' असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले,' पत्रकारांनी समाज, सरकार तुमच्यासोबत येईल, ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा पत्रकारांनीच पत्रकारांसाठी आता काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण पत्रकारावर हल्ला झाला तर पत्रकार वगळता कोणी निवेदन सुद्धा देण्यासाठी पुढे येत नाही. हे आपण वारंवार पाहतो. त्यामुळे आता मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना मदत करता यावी, यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून एक कोटी रुपयांचा फंड उभारण्यासाठी काम करत आहे. या फंडामधून दरवर्षी किमान २५ पत्रकारांना मदत करता आली तरीही ते खूप मोठे काम होईल.' आमदार भीमराव केराम मेळाव्याला राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचे स्वागत केले, व ते म्हणाले,' मराठी पत्रकार परिषद राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. लेखणीच्या माध्यमातून आमच्या सारख्या राजकीय नेत्यांनी केलेली कामे पत्रकार लोकांसमोर आणतात. तसेच वेळप्रसंगी लेखणीतून आम्हाला आमच्या चुका दाखवून देण्याचे कामही पत्रकार करतात. खरंतर एखाद्या राजकीय नेत्याची ओळख ही पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातूनच होत असते,' असे सांगत आमदार केराम यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव केला. तसेच परिषदेचे मुख्य विश्वस्त यांच्या संघर्षाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सीएनएन १८ न्यूज च्या ब्युरो चीफ विनया देशपांडे म्हणाल्या की, ' आजच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण अनेकदा आपल्या गावातील प्रसंगी प्रश्न हे भाषेचा अडथळा असल्याने आपण मर्यादित लोकांपर्यंत पोहोचवतो. मात्र 'एआय' चे दारे उघडल्याने भाषेचा अडसर संपत असून या संधीचा आता ग्रामीण भागातील पत्रकारांनी फायदा घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या गावातील, मातीतील प्रश्न जगभरात पोहोचवण्याची ही संधी आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता मोठ्या संधीचा फायदा घ्या,' असे आवाहन देशपांडे यांनी केले. 'ज्या लोकशाहीला स्वतःच्या त्रुटींची जाणीव असते, ती प्रबळ लोकशाही असते. अशा लोकशाहीची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असणे गरजेचे आहे,' असे सांगतानाच देशपांडे यांनी परदेशामध्ये पत्रकारिते संबंधित आलेल्या अनुभवांची माहिती यावेळी दिली. स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर म्हणाले, 'आज राज्यभरातील पत्रकार येथे आल्याचा आनंद होत आहे. आज मंडपामध्ये बसण्यासाठी जागा नाही, एकही खुर्ची रिकामी नाही, हेच या कार्यक्रमाचे यश आहे. टेक्नॉलॉजी सुधारत असली तरी वर्तमानपत्रातील बातमीची विश्वासार्थता कायम आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांचे कौतुक करतो,' असेही ते म्हणाले. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी जिल्हा व तालुका पुरस्कार विजेत्या संघानी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच माहूर तालुका पत्रकार संघ व नांदेड जिल्हा पत्रकार संघाने माहूरगड पत्रकार मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. पाबळे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वाटचालीची माहिती दिली. परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की,' मराठी पत्रकार परिषदेला ८४ वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला कुठेही गालबोट न लावता, व कोणासमोर न झुकता पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचे काम मराठी पत्रकार परिषदेने केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची साथ असल्यामुळेच पत्रकारांचे प्रश्न सोडवणे शक्य होत आहे. *'👉या' जिल्ह्याचा करण्यात आला पुरस्कार देउन सन्मान* *रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा *उत्तर_नगर* आणि *दक्षिण_नगर* जिल्ह्यांना विभागून देण्यात आला* दक्षिण नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी स्वीकारला. तर, उत्तर नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष अमोल वैदय यांनी स्वीकारला. *वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार* 1) मराठवाडा विभाग : *माजलगाव तालुका पत्रकार संघ*, जिल्हा बीड 2) लातूर विभाग : *माहूर तालुका पत्रकार संघ*, जिल्हा नांदेड 3) नाशिक विभाग : *साक्री तालुका मराठी पत्रकार संघ* जिल्हा धुळे 4) पुणे विभाग : *शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ*, जिल्हा पुणे 5) अमरावती विभाग : *तेल्हारा तालुका पत्रकार संघ*, जिल्हा अकोला 6) कोल्हापूर विभाग : *बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ*, जिल्हा सांगली 7) नागपूर विभाग : *आर्वी तालुका पत्रकार संघ* जिल्हा वर्धा 8) कोकण विभाग : *अंबरनाथ तालुका पत्रकार संघ* जिल्हा ठाणे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी

तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
• श्रीनिवास मदनलाल सोनी

लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

Publisher Information
Contact
Udgirsamachar@gmail.com
9421485971
Udgir samachar office shivaji society udgir
About
Weekly marathi paper published in udgir
Share this page
Email
Message
Facebook
Whatsapp
Twitter
LinkedIn