पोलिस प्रशासन, नपा संयुक्तेने उदगीर बॅनर मुक्त ! 👉 पोलिस निरीक्षक कदम याचे पत्र जाताच नगर पालिकेचे उघडले डोळे उदगीर :- उदगीर शहरात मागील काही दिवसापासून भावी आमदार,नगरसेवक, अण्णा, भाऊ, दादा, याचे काहीही असले की मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बॅनर लावण्याचे प्रकार वाढले होते,काही जण तर लग्नात सगळ्या उदगीरकराना निमंत्रण देण्यासाठी लग्नाचे बॅनर लावले का हा प्रश्न सामान्यांना पडत होता ,या बॅनर मुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन बॅनर पहानाच्या नादात अपघात घडत असल्याने शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी नगर पालिकेस 23/1/2024 रोजी पत्र देऊन संबंधित बॅनर काढून शहर बॅनर मुक्त करावे अन्यथा काही विपरीत घडल्यास नप जबाबदार राहील असे सांगताच नप ने आपले कर्मचारी देऊन पोलीस प्रशासनासोबत मिळून आज शहारातील मूख्य रस्त्यांवरील अवैध बॅनर हटवल्याने शहारातील मुख्य रस्ता पूर्ण खुल्ला दिसत असून आता शहर किती दिवस बॅनर मुक्त रहाते हे पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी

