केंद्रीय दुग्ध विकास, पशू संवर्धन, मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला सोमवार 29 जानेवारी रोजी उदगीर दौऱ्यावर 👉 डेअरी पुनर्जीवन समिती च्या प्रयत्नाला ला यश,लवकरच उदगीर ची डेअरी केन्द्र चालु होण्याच्या आशा उंचावल्या उदगीर--केंद्रीय दुग्ध विकास, पशू संवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला हे सोमवारी दि.29 जानेवारी रोजी हैदराबाद येथून दुपारी 1 वाजून 45 मिनिटानी उदगीर येथे येत असून ते उदगीर दौऱ्यात उदगीरच्या बंद पडलेल्या दूध डेअरी ची पाहणी करणार आहेत. दुपारी दूध डेअरी परिसरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार असून या मेळाव्यास शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन खा. सुधाकर शृंगारे यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केले. केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना उदगीरची बंद पडलेली दूध डेअरी पुर्ववत सुरू करण्यासाठी विनंती केली आहे. त्यामुळे ते स्वतः पाहणी करण्यासाठी उदगीरला येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे खा.सुधाकर शृंगारे म्हणाले.पत्रकार परिषदेस माजी आमदार गोविंद केंद्रे, जि. प. चे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले,सुधीर भोसले,ऍड. दत्ता पाटील, अमोल निडवदे, बालाजी गवारे, गणेश गायकवाड, मोतीलाल डोईजोडे, संतोष कुलकर्णी, शिवशंकर धुप्पे यांची उपस्थिती होती.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
