गेलेलाच नप मुख्यधिकारी चांगला म्हणण्याची उदगीरकरावर पाळी :- ज्या मुख्याधिकाऱ्याना महात्मा गांधींनी पुण्यतिथी माहीत नाही, प्रजासत्ताक दिनी कधी स्वातंत्र्यदिन कधी असतो हे माहीत नाही अश्याना अधिकारी म्हणून काम मिळते कसे? अशी चर्चा जोरात :- उपजिल्हाधिकारी हे फक्त नोटीसच देतात का ठोस कार्यवाही करतात हे पाहावे लागेल :- बिनडोक मुख्याधिकाऱ्यावर कार्यवाही करा माजी आमदार शिवराज तोंडचिरकर उदगीर:- 30 जानेवारी संपूर्ण जग ज्यांच्याकडे महात्मा म्हणून पहाते त्या महात्मा गांधींजीच्या पुण्यतिथी ची आठवण उदगीर नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष म्हणून स्वताची पाठ थोपटून घेणारे मुख्याधिकारी सुंदर बोंदर याना नसावी ही किती दुर्दैवाची बाब आहे हे त्याना सांगावे कोण, बोंदर यानी या दिवशी खरे तर महात्मा गांधी गार्डन स्वच्छ करून घेतले पाहिजे, महात्मा गांधींजीच्या पुतळ्याची स्वछता करणे अनिवार्य असताना हे तर सोडाच गांधी गार्डन ला कुलूप लाऊन ठेवलें अश्या बिनडोक मुख्याधिकार्यावर त्वरीत कार्यवाही करावी अशी तक्रार माजी आमदार शिवराज तोंडचिरकर यानी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या नंतर नप चे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यानी सुंदर बोंदर मुख्यधीकारी नप उदगीर, उलागड्डे कार्यालयीन अधीक्षक तथा उमाकांत गंडारे स्वच्छता निरीक्षक नप उदगीर याना जावक क्र 2024/संकीर्ण काकी/ 30/01/2024 ने कारणे दाखवा नोटीस बजावली असून आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून अपना विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील )1979 मधील तरतुदी नुसार कार्यवाही का करण्यात येऊ नये याचा खुलासा दोन दिवसांत करावे असे निर्देश दिले असून आता उपजिल्हाधिकारी खरेच मुख्याधीकारी याना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करतात किंवा छोट्या कर्मचाऱ्यावर आरोप ठेऊन त्याच्यावर कारवाई करतात हे पाहावे लागेल तसेच महात्मा गांधींच्या नांवाने जोगवा मागणारे मुख्याधिकाऱ्यावर कार्यवाही करा म्हणून रस्त्यावर येतील का , का मूग गिळून गप्प बसतील हेही पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी

