*उदगीर शहरात मराठा भवन बांधकामासाठी १० कोटी रुपयाचा निधी मंजुर* *क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना.संजय बनसोडे यांची माहिती* *उदगीर :* उदगीर शहरात मराठा भवन बांधकाम करण्यासाठी 'वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन' १० कोटी रुपयाचा निधी मंजुर करण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना.संजय बनसोडे यांनी दिली आहे. उदगीर शहरातील मराठा भवन बांधकामासाठी १० कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याने मतदार संघातील मराठा समाज बांधवांकडुन ना.संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले जात आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी