गळफास घेऊन आदिवासी विद्यार्थिनीची आत्महत्या ? उदगीर : येथील जय हिंद पब्लिक स्कूलच्या परिसरात एका अठरा वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीने गळफास घेतल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली .याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुरुवारी दुपारी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे . ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , नांदेड जिल्ह्यातील खरबी ता . हदगाव येथील मयत विद्यार्थिनी रत्नेश्वरी दत्ता शेळके वय (१८ ) ही उदगीर येथील जय हिंद पब्लिक स्कूल येथे इयत्ता बारावीच्या वर्गात शिकायला होती .बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही मुलगी गळफास घेतल्याचे आढळून आली .उपचारासाठी तिला उदगीर येथील सामान्य रुग्णालयातत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले .याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल हे करीत आहेत .
• श्रीनिवास मदनलाल सोनी