लातूर लोकसभा भाजप भाकरी फिरविणार, सुधाकर च्या जागी सुधाकर येणार ? उदगीर:- लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे भाजप कडून मीच भावी उमेदवार म्हणून बातम्या पेरल्या जात असल्याचे दिसत असताना लातूर लोकसभा मतदार संघात चालु खासदारा बद्दल जी निष्क्रियता जनतेत आहे त्याची दखल वरीष्ठ पातळीवर घेतली गेल्याचे दिसत असून या वेळेस या खासदाराला डच्चू देऊन नवीन उमेदवार देण्याची प्रक्रिया वरी चालु असून सुधाकराला बदलून येथे सुधाकरच येईल असे मत जाणकार व्यक्त करत असल्याने भाजप लातूर लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरविणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेष दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी