उदगीरात तेच रेल्वतही तेच मुंबईत ही तेच ,बडव्यांनी घेरले विठ्ठलाला ! 👉विठ्ठलाला आणणार संकटात ? 👉 विठ्ठलाने त्वरीत दक्षता घेऊन भक्तांना दर्शन द्यावे अन्यथा उभा विटेवरी कर कटेवरी ठेवल्या सारखे होऊ नये अशी चर्चा भक्तात दिसत आहे उदगीर :- उदगीरला मंत्रिपद मिळाल्यापासून अनेक जण ज्यांची गावांमध्ये फार प्रतिष्ठा आहे असे कांही जन विठ्ठल उदगीरला आल्यानंतरही सोबत तेच, रेल्वेतही तेच आणि मुंबईत तेच विठ्ठलाला घेरत असल्याने जणू काही मतदारसंघातील भक्तांना विठ्ठलाच्या जवळ जाऊ न देण्याचा ठेका घेतल्यामुळे उदगीर व जळकोटच्या भक्तांच्या मनात विठ्ठला बदलची श्रद्धा कमी व्हावी व भक्त दूर जाऊन विठ्ठलालाच त्याचा फटका बसावा असेच चित्र काही बडवे करत असल्याचा अनुभव उदगीरकरांना येत असून या परिणामाचे रूपांतर नाराजीत झाल्यास बडव्यांच्या वागणुकीचे व वर्तनाचे फळ विठ्ठलाला भोगावे लागेल? अशीच चर्चा मतदारसंघात चालू आहे. आता तरी विठ्ठलाने बडव्याना दूर सारून भक्तांना दर्शन द्यावे अशी अपेक्षा सामान्य भक्त व्यक्त करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी