लातुर बिदर मुंबई रेलवे ला तीन डब्बे वाढले ही माहिती चूक:- श्यामसुंदर मानधना 👉लातूर-बीदर-मुंबई एक्स्प्रेसच्या डबे संरचनेत बदल उदगीर : लातूर, बीदर-मुंबई एक्स्प्रेस डब्यांच्या संरचनेत बदल झाला असून, यात ११ जानेवारी २०२४ पासून दोन डबे बदलले आहेत. काहींनी तीन डबे वाढल्याचे वृत्त देऊन चुकीची माहिती पसरवली. पूर्वी १८ डब्बे होते, आज ही १८ च डब्बे असणार आहेत, दोन डबे बदलले आहेत. एक जनरल डब्याच्या जागी एक वातानुकूलित डबा जोडला आहे. एक वातानुकूलित फर्स्ट कम सेकंड एसी डब्याच्या जागी एक पूर्ण प्रथम श्रेणी वातानुकूलित डबा जोडला आहे. काहींनी सदर गाडीला तीन डबे वाढल्याचे वृत्त पसरवले. ते चुकीचे असून डब्यांच्या संख्येत बदल न करता फक्त दोन डबे बदलून संरचनेत बदल केला असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पूर्वी १८ डबे होते, ते तेवढेच असून, सध्या रेल्वेगाडी पूर्वीप्रमाणे १८ आयसीएफ डब्यांसोबत धावत आहे. 👉लातूरं, बीदर-मुंबई एक्स्प्रेसच्या डबे संरचनेत बदल झाला असून डब्यांची संख्या पूर्वीप्रमाणेच असेल. भविष्यात लातूर, बीदर-मुंबई रेल्वेगाडीला डबे वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. – शामसुंदर मानधना, सदस्य मध्य रेल्वे सल्लागार समिती, मुंबई.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
