राजस्थानी मल्टीस्टेट ने उदगीर कराना लावला करोडोचा चुना? 👉 लोकाना जास्त व्याज, हेलिकॉप्टर राइड चे स्वप्न दाखऊन घेतली करोडोची ठेवी 👉 डायरेक्टर (चंदुलाल बियाणी) म्हणतात मी डी. एम.चां राईट हॅण्ड तुम्हाला जे करायचे ते करा माझे काहीच वाकडे होणार नाही उदगीर:- राजस्थानी मल्टीस्टेट को - ऑप. क्रेडिट सोसायटी मुख्य कार्यालय परळी यानी उदगीर येथील देगलुर रोड वरील लासूने कॉम्प्लेक्स वर मोठया थाटात उद्घाटन केले, मोठया व्याजाचे आमिष दाखवत काही एजेंट ना वेगळे कमिशन चे आमिष दाखवत अनेक पिग्मी एजेंट नेमून लाखो रुपयांची ठेवी, आर डी जमा केली, यानी पैसे तर जमा करुन घेतलें पण शाखाधिकारी याना फक्त 10 हजार रु काढण्याचे अधिकार दिले, ग्राहकांना यांच्या फसवणुकीची कल्पना येताच ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी बँकेत चकरा मारायला सुरुवात करताच शाखेतून शाखाधिकारी परळी हेड कॉर्टर ला जाऊन बसले, या नंतर अनेक ठेवीदार परळी येथे गेले असता सर्व डायरेक्टर ही गायब असल्याने त्यांना निराश होऊन परतावे लागत असून, या संदर्भात सहायक निबंधकाकडे ग्राहकांनी तक्रार करण्यास गेले असता त्यांनी संबंधित मल्टीस्टेट चां परवाना दिल्ली येथे असून तेथें तक्रार करा असे म्हणाल्याचे ग्राहक सांगत आहेत, पहले काही दिवस डायरेक्टर चंदुलाल बियाणी यांनी ग्राहकास तुमचे पैसे 1 तारखेस मिळतील असे आश्वासन दिले नंतर ते ग्राहकास धमकावून तुम्हाला काय करायचे ते करा मी डी एम चां माणूस आहे माझे कोणी वाकडे करू शकत नाही असे म्हणल्याचे ग्राहक सांगत असून, या महाशयांनी अनेकांचे संसार देशो धडीस लावले असून प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन गोर गरीबाचे ठेवी त्वरीत मिळउन द्यावे अशी मागणी ग्राहक करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

