अद्यावत क्रिडा संकुल उभारणी बामणी येथील गायरान जमिनीवर करावी:- क्रिडा प्रेमी 👉 100कोटी चे हे अद्यावत क्रिडा संकुल असेल 👉 महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबर चे अद्यावत क्रिडा संकुल असून प्रसिद्ध वास्तू तज्ञ सी सी प्रभू हे या वास्तू चें वास्तू तज्ञ असतील उदगीर:- येथील तळवेस येथील पटांगणावर 100 कोटी रूपये खर्च करून अद्यावत असे अद्वितीय क्रिडा संकुल उभारले जाणार असून त्याचा अपेक्षित खर्च 67 कोटी ची मंजुरी मिळाली असून लवकरच या निधी सह वाढीव निधी अपेक्षित असून हे संकुल तळवेस पेक्षा बामणी येथील गायरान जमिनीवर उभारावे असे मत अनेक क्रिडा प्रेमी नी उदगीर समाचार कडे बोलून दाखवले असून हे क्रिडा संकुल बामणी येथील जागेवर झाल्यास पुढे ज्या वेळेस उदगीर जिल्हा घोषित होईल त्या वेळेस हे क्रीडा संकुल मुख्य रस्त्यावर येईल,बाहेरून येणाऱ्या क्रिडा प्रेमी ना हवाई व इतर मार्ग सोपा होईल या सह अनेक मुद्दे असून हे अद्यावत क्रीडा संकुल बामणी येथील गायरान जागेत उभारावे असे मत क्रिडा प्रेमी करत असून आता या बाबीकडे क्रिडा विभाग कसे पहाते, काय निर्णय घेते हे पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी