महविकास आघाडी तर्फे उद्या गुरुवार रोजी उदगीरात भव्य विराट मोर्चा उदगीर= केन्द्र व राज्य शासनाच्या जुलमी कारभाराविरुध उदगीर व जळकोट तालुक्यांतील माहविकास आघाडीच्या वतीने उदगीर येथे भव्य विराट मोर्चाचे 15 फेब्रुवार गुरुवार रोजी आयोजन केल्याचे पत्रकार परिषदेत आयोजकांच्या वतीने बस्वराज पाटील नागराळकर यानी सांगितले आहे केन्द्र व राज्य शासनाच्या जुलमी कारभाराविरोधात , शेतकरी शेतमजूर, विद्यार्थी,बेरोजगार,महीला, गृहिणी सह स्थानिक मुद्दे घेऊन महाविकास आघाडी डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर चौक ते छत्रपति शिवाजी महाराज पुतळ्या पर्यन्त सकाळीं 10 वाजता विराट मोर्चा काढणार असल्याचे महविकास आघाडी तर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बस्वराज पाटील नागराळकर यानी सांगितले या वेळेस या पत्रकार परिषदेत आघाडी पक्ष्याचे बस्वराज पाटील नागराळकर,शिवाजीराव हुडे,कल्याण पाटील, चंद्रकांत टेंगेटोन, शिवाजीराव मुळे,रंगा राचुरे, प्रिती भोसले, ॲड. प्रभाकर काळे, मधुकर एकुर्केकर, गजानन सताळकर,आशिष पाटील राजूरकर, अजित शिंदे,अजीम दायमी, उषा कांबळे, अरुणाताई लेंडाणे सह अनेक नेते उपस्थित होते
• श्रीनिवास मदनलाल सोनी
