उदगीर नप पाणी पट्टी वाढीचे श्रेय सत्ताधारी भाजपा चे का विरोधकांचे? 👉 नळ पट्टी कमी होणार म्हणून पाठ थोपटून घेणारे आज मूग गिळून गप्प 👉 सामान्य नागरिकांना तेच दिवस आठ दिवसाआड पाणीपुरवठा, नळ पट्टी 1500 रू ची झाली 3000 रू उदगीर= उदगीर शहरास लिंबोटी धरणातून आता दररोज पाणी पुरवठा होणार हे गाजर दाखवत सामान्य नागरिकांची कशी फसवणूक सत्ताधाऱ्यांनी केली आणि त्यांना विरोधकांनी कशी साथ दिली हे जर पाहायचे असेल तर उदगीर नगर पालिकेचे काम पाहावे लागेल उदगीर नगर पालिकेवर जनतेनी मागील काळात सत्ता दिली त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांनी असा करून घेतला की त्यांची आठवण उदगीरकर जिंदगी भर विसरणार नाहीत कारण की अटल पाणी पुरवठा योजनेतून करोडो रूपये खर्च करून लिंबोटी धरणातून उदगीर ला पाणी आणण्यात आले खरे, सत्ताधारी भाजपाने आता दररोज पाणी मिळणार म्हणून स्वतःची पाठ थोपटून या योजनेचे उद्घाटन ही करून घेतलें ,अनेक ठिकाणी पाइप लाइन साठी फोडलेले रस्ते तसेच आहेत, आज पर्यन्त लिंबोटी चे पाणी दररोज येणारं या आशेने उदगीरकर जगत आहेत पण यानी पाणी दररोज देणे तर सोडाच उदगीर कराना चक्क वाऱ्यावर सोडले, नप वर प्रशासक येताच पाणी पट्टी 1500 रू वरून चक्क डबल करत 3000 रू केली, काहीनी मोर्चे काढले,निवेदन ही दिले ,काही नेत्यांनी आश्वासनही दिले पाणी पट्टी वाढणार नाही, दिवसा मागून दिवस गेले आणि पाणी पट्टी कमी होणार या आशेवर जगणाऱ्या उदगीरकराना आता एक नाही दोन वर्षाची पाणी पट्टी 6000 रू भरावे लागत असून ही सत्ताधारी व विरोधक गप्प आहेत, या पाणी पट्टी वाढीचे श्रेय सत्ताधारी भाजपा घेणार का विरोधक हे पाहावे लागेल आणि त्रस्त उदगीरकर या दोघांनाही कसे पाणी पाजवतात हे पुढील काळात दिसेलच
• श्रीनिवास मदनलाल सोनी
