उदगीर कृ. उ. बा. समिती सभापती शिवाजीराव हूडे विरुद्धचा जिल्हा उनिबंधकांचा आदेश मा. उच्च न्यायालयाने केला रद्द 👉 जिल्हा उनिबंधकांना सदरील पुनर्विचार याचिका चालवण्याचा अधिकार नसल्याचे न्यायालयाने केले स्पष्ट उदगीर:- उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवाजीराव हुडे यांच्या पैनल ने एकतर्फी विजय प्राप्त करत शिवाजीराव हुडे सभापती पदी विराजमान झाल्याने त्यांच्या व सर्व संचालकाविरोधात रमेश भंडे, धनाजी गंगणबिडे यानी जिल्हा उपनबंधकांकडे याचिका दाखल केली होती पण 2017 च्या नियमानुसार जिल्हा उनिबंधक बदणाळे याना 72 A नुसार सदरील याचिक चालवण्याचा अधिकार नसताना त्यांनी सभापती, संचालकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते या विरुद्ध सभापती, सदस्यांनी मा. उच्च न्यायालयात दाद मागितली असता मा. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यानी 21/02/2024 रोजी सदरील याचिका मंजूर करत उपनिबंधकाचे आदेश रद्द केले असून शिवाजीराव हुंडे, संचालकातर्फे ॲड.महेश देशमुख, ॲड. उध्दव मोमले, ॲड.मनीष त्रिपाठी यानी काम पाहिले अशी माहिती अड उध्दव मोमले यानी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
