नळगीर ग्रापांचायत सरपंच श्रीमती अंजुशा उगीले, सदस्य पद्माकर उगिले यांचे कारनामे, गटविकास अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा अवहाल सादर केला जिल्हाधिकाऱ्यांकडे 👉 सरपंच श्रीमती अंजुषा पद्माकर उगीलें,सरपंच पती सदस्य पद्माकर उगिलें वर टांगती तलवार? 👉 प्रविण सुरडकर गट विकास अधिकारी पंचायत समिती उदगीर यानी उदगीर समाचार ला सांगितले की जिल्हाधिाऱ्यांच्या आदेशाने विस्तार अधिकारी यानी सर्व तक्रारीची चौकशी करून सदरील अवाहाल दिला असून तो अहवाल जिल्हाधिकारी याना पाठवला असून पुढील कार्यवाही जिल्हाधिकारी करतील उदगीर:- उदगीर तालुक्यातील नळगीर ग्रामपंचायत सरपंच श्रीमती अंजूषा उगिले व सरपंच पती तथा ग्रामपंचायत सदस्य पद्माकर उगीले यानी भ्रष्टाचार केल्याची तक्रार जयप्रकाश नरदेव कापसे व इतर नी जिल्हाधिकाऱ्यांकडे 30/12/2022 रोजी केली होती, त्यावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गट विकास अधिकारी यानी विस्तार अधिकारी याना चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले त्या नुसार विस्तार अधिकारी यानी केलेल्या चौकशीचा अहवाल 5/2/2024 रोजी जा क्र.2024/पं. स. उ./पं .वि./कार्य 1/कावि140/सी आर ने सादर केला असून त्यात सरपंच व पती सदस्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवला असून आता या दोघांवर जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतात हे पाहावे लागेल 🌹 अहवालात ठेवलेले ठपके🌹 👉 ग्रापंचायत सरपंच श्रीमती अंजुशा पद्माकर उगीले व सरपंच पती तथा ग्रामपंचायत सदस्य पद्माकर उगीले यानी अप्रत्यक्ष रित्या भागीदार मार्फत लाभ उचलला दिसत असून श्री कृष्णाई काँट्रेक्टर डेव्हलपर, श्री कृष्णाई खडी केन्द्र नळगीर यानी जे काम केले आहे ते यांचे नातेवाईक असून यानी लाभ घेतल्याचे दिसते (सोबत कामाची यादी दिली आहे) 👉 शेतकरी अभ्यास दौऱ्याच्या नावावर निधीचा गैरवापर,28 शेतकऱ्या ऐवजी 8 शेतकरी अभ्यास दौऱ्यास पाठउन 28 शेतकऱ्याचे 2 लाख निधी चां गैरवापर 👉 जी एस टी, गौण खनिज, कामगार विमा, अन्य अनेक संबंधित विभागास भरला नाही असे अनेक मुद्दे चौकशीत निष्पन्न झाल्याने आता या दोघांवर जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतात हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी