राजस्थानी मल्टीस्टेट वर सक्त कार्यवाही करा, संजय बनसोडे चे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश उदगीर= राजस्थानी मल्टीस्टेट शाखा उदगीर येथे ज्या ज्या ठेवीदारांची फसवणूक झाली आहे त्यांचे शिष्टमंडळ आज उदगीर चे आमदार तथा राज्याचे क्रिडा,युवक कल्याण, बंदरे मंत्री संजयजी बनसोडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी तक्रार केली असता मंत्री महोदयांनी उदगीर चे उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक भागवत याना संबंधित बँकेवर त्वरीत सक्त कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून आता सर्व ठेवीदार बँकेच्या संचालकां विरुद्ध व्यक्तिगत तक्रार देणार असल्याचे ठेवीदारांनी उदगीर समाचार सोबत बोलताना सांगितले आहे, आता ठेवीदार आर पार ची लढाई सुरू करणार असल्याने राजस्थानी मल्टीस्टेट च्या सर्व संचालकांना पळती भुई थोडी होणार असे दिसते, या दिलेल्या तक्रारीवर सिस्टमंडळातील 50ते 60 ठेवीदारांच्या सह्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
