अंधश्रद्धेचा कळस; गुन्हे वाढत असल्यामुळे पोलिस ठाण्याच्या गेटवरच बोकडाचा बळी! 👉उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यातील प्रकार उदगीर दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर मात्रा शोधत ठाण्याच्या गेटवरच पोलिसांनी बोकड कापून शांती केली. अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये घडला. वर्षभरापूर्वी एका अधिकाऱ्याने या पोलिस ठाण्याचा पदभार घेतला. मात्र, कारभार हाती घेतल्यापासून ठाण्याच्या हद्दीत अपघात व गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले. यावर उपाय शोधण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना एका अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर आली. त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांवर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली. त्यानुसार एका अधिकाऱ्याने एक बोकड आणि त्याला कापणारा कसाई यांना पोलिस ठाण्यात आणले. आणि त्या बोकडाचा पोलिस ठाण्याच्या गेटवरच बळी देण्यात आला 👉घटना घडली तपास चालु आहे आमच्या ठाण्यात जातीयवाद आणि गटबाजी आहे. अनेक लॉबी या पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. वर्षभर मी कुणालाही बेकायदेशीर काम करू दिलेले नाही. त्या रागातून किंवा गटबाजीतून हा फोटो व्हायरल केला असावा. मात्र, हा प्रकार घडला तेव्हा मी पोलिस ठाण्यात नव्हतो. उपविभागीय पोलिस अधिकारी आता येथे आले आहेत तपास चालु असल्याचे अरविंद पवार, पोलिस निरीक्षक, उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन यानी उदगीर समाचार ला सांगितले 👉 *फार्म हाऊसवर बिर्याणी सकाळी 9=30 ते 10 च्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या मुख्य गेटवर बोकड कापण्यात आला, त्यानंतर याचे फोटोसेशन करून हा बोकड मलकापूर शिवारातील एका राजकीय पुढाऱ्याच्या फार्म हाऊसवर नेण्यात आला. तेथे बनवण्यात आलेल्या बिर्याणीवर सायंकाळी अधिकाऱ्यांसह तिथे हजर असलेल्या सर्वांनी ताव मारला. 👉आता अंधश्रद्धा निर्मुलन समिती काय करणार हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी
