पोलिस ठाण्यात बोकुड बळी प्रकरणाची चौकशी करून त्वरीत कार्यवाही करा = अनिस 👉 अनिस तर्फे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली मागणी उदगीर= येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या आवारात बोकुड बळी प्रकरणाची चौकशी करून या घटनेस जबाबदार व्यक्ती वर त्वरीत कार्यवाही करावी असे निवेदन उदगीर अनिस तर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयातील पोलिस निरीक्षक कुलकर्णी याना देऊन कऱण्यात आली या निवेदनावर बळीराम भुगतरे,बाबुराव माशाळकर, प्राचार्य विजयकुमार पाटील, विश्वनाथ मुडपे गुरुजी,योगेश बिरादार, संजय काळे, दिपक बलसुरकर, श्रीनिवास एकुर्केकर,हणमंतराव बुळला, सुरेंद्र अक्कनगिरे,बाबुराव हिप्पळगे सह अनेकांच्या सह्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
