जे नवे ते उदगीर ला हवे, उदगीर ला आलेले अधिकाऱ्यांनी पळवाट काढून लातूर ला पळवावे! 👉 उदगीर सामान्य रुग्णालयातील मंजुर टेलिकलेक्शन हब जागा नसल्याचे कारण पुढे करत सदरील हब लातूर च्या स्त्री रूग्णालयात करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकाचे पत्र 👉 ना. संजय बनसोडे यांचे स्वप्न भंग करण्याचा अधिकाऱ्याचा डाव ? उदगीर:- जे जे नवे ते उदगीर ला हवे असे स्वप्न उराशी बाळगून उदगीर चे आमदार तथा महाराष्ट्राचे क्रिडा युवक कल्याणव बंदरे मंत्री संजय बनसोडे प्रयत्न करत असताना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात टेलीकलेक्शन हब ला राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत मंजूरी दिली येथे भरपूर जागा रिकामी असताना सुद्धा हे टेली कलेक्शन हब करण्यासाठी उदगीर च्या सामान्य रुग्णालयात जागा रिकामी नसल्याचे कारण पुढे करत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप एम. ढेले यानी दि. 09/02/2024 जा क्रं. जिशचील/1964-68/2022 ने सहाय्यक संचालक(तांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई याना देऊन सदरील टेलीकलेक्शन हब हे लातूर येथील स्त्री रूग्णालयात करण्याचे कळवले असल्याने जिल्हा शल्य चिकीत्सकाच्या या निर्णयाने उदगीर तालुक्यात रोषाचे वातावरण असून येथील सामान्य रुग्णास टेलीकलेक्शन हब मुळे बाहेरील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन,उपचार मिळणार होते ते आता मिळणार नाही या बाबीकडे लक्ष देऊन हे टेली कलेक्शन हब येथेच व्हावे, येथे जागा रिकामी नाही असे कळवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
