कांग्रेस ला खिंडार, राजेश्वर निटूरे, अर्चनाताई चाकूरकर भाजपात उदगीर:- येथील काँग्रेस चे ज्येष्ठ नेते तथा काँगेस कडून 7 वेळेस उदगीर नगरी चे नगराध्यक्ष पद भूषविलेले राजेश्वर निटूरे आणि काँगेस चे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुष्णा अर्चनाताई पाटील चाकूरकर यानी आज मुंबई येथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजापात प्रवेश केला, या दोघांच्या भाजपात जाण्याने काँगेस ला मोठे खिंडार पडले असून आता काँगेस ची पुढे अवस्था काय हे थोड्याच दिवसात पहाण्यास मिळेल. तर या दोघांच्या भाजपाचा येण्याने भाजपचे जुने नेते, कार्यकर्ते हे संभ्रमात असल्याचे दिसत आहे,त्यांची अवस्था पुढे आड तर मागे विहीर अशी दिसत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
