मा. ना. संजय बनसोडे यांनी एक्या निश्याण्यात तिघांची केली शिकार! उदगीर:- मा. ना. अजित पवार गटाचे तथा महाराष्ट्राचे क्रीडा, युवक कल्याण व बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी काँगेस चे पूर्व नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे याना भाजपात पाठउन अनेक जण एक्या दगडात दोन शिकारी करतात पण बनसोडे यांनी एका दगडात तीन शिकार केल्याची चर्चा उदगीर मतदार संघात चालु आहे महाराष्ट्राचे क्रीडा युवक कल्याण व बंदरे मंत्री तथा उदगीर मतदार संघाचे भाग्य विधाते अजित पवार गटाचे संजय बनसोडे हे नुसते विकास पुरुष नसून ते किती चाणाक्ष आहेत हे उदगीर मतदार संघातील जनतेने आज प्रत्यक्षात पाहिले असून अनेक जण म्हणतात की अमुकानी एक्या दगडात दोन पक्ष्याची शिकार केली पण बनसोडे यांनी उदगीर काँगेस चे ज्येष्ठ नेते तथा 7 वेळेस नगराध्यक्ष पद भूषविलेले राजेश्वर निटूरे याना भाजपात पाठउन एक्या दगडात तीन शिकार केल्याची चर्चा उदगीर मतदार संघात जोरात चालु असून बनसोडे यांनी निटूरे रुपी गांडिव धनुष्य वापरून प्रथम बनसोडे याना कमी लेखणाऱ्या देशमुख परिवारास त्यांची जागा दाखवून दिली, दुसरी बाब काँगेस ला न घरका न घाट का केले तर तिसरी बाब त्यांनी काही भाजप नेत्याकडून, कार्यकर्त्या कडून त्यांच्या विकास कामावर होणारी टिका खोडून काढण्यासाठी निटूरे रुपी अस्त्र भाजपात पाठउन त्यांनी पूर्ण विरोधकांचे आव्हानच साफ केल्याची चर्चा उदगीर मतदार संघात चालु असून आता निटूरे रुपी अस्त्र कोना कोणाचे जिरविते हे पुढील काळात दिसेल पण भाजपा च्या काही नेत्यांना, कार्यकर्त्यांना आता हुडवा उकरून गोवऱ्या वेचण्याची वेळ आणल्याचे जाणकार सांगत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
