राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी समीर शेख यांची निवड उदगीर = राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या मान्यतेने महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या शिफारसी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी उदगीर येथील माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष समीर शेख यांची नियुक्ती केली आहे. यांच्या या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे, अहमदपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील, छ. संभाजी नगर शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रमजी काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस व्यंकट बेद्रे ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष अफसर बाबा शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष पंडीतराव धुमाळ, जिल्हा नियोजन समिती चे सदस्य प्रा श्याम डावळे, विधानसभा अध्यक्ष प्रा प्रवीण भोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे, राकाँपा सांस्कृतिक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे, राकॉपाचे अल्पसंख्यांक विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष शफी हाशमी आदीनी अभिनंदन केले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
