चोरानो सावधान !उदगीर रेल्वे स्थानकात बसविले सिसिटीवी कॅमेरे उदगीर : येथील रेल्वे स्थानकात सोमवारी दहा सिसिटीवी कॅमेरे बसविण्यात आले. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अनेक महिन्यांपासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे. नुकतेच उदगीर रेल्वे स्थानकास महाव्यवस्थापक अरुण जैन यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी उदगीर रेल्वे संघर्ष समिती व विविध संघटना आणि नागरिक यांनी अनेक मागण्या केल्या होत्या, यामध्ये सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याची मागणी प्रभावीपणे मांडण्यात आली. यावेळी सिकंदराबाद विभागाचे विभागीय व्यवस्थापक भरतेशकुमार जैन देखील उपस्थित होते. सी सी टी व्ही ची मागणी विभागीय व्यवस्थापक यांनी गंभीरपणे घेत तात्काळ सी सी टी व्ही बसविले. पहिल्या टप्प्यात 10 कॅमेरे बसविण्यात आले असून यामुळे उदगीर रेल्वे स्थानकाची सुरक्षा मजबूत झाली असून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीवर आळा बसणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी दहा बसविण्यात येणार आहेत. याशिवाय रेल्वे पोलीस बळाचे पोस्ट (RPF OUT POST)देखील होण्याच्या तयारीत आहे. तसेच कॅमेरे उपलब्ध झाल्यामुळे अनेक महिन्यापासून असलेली मागणी पूर्ण झाल्याबद्दल उदगीर रेल्वे संघर्ष समितीचे सचिव तथा उपभोगता सल्लागार समिती दक्षिण मध्य रेल्वेचे सदस्य मोतीलाल डोईजोडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी