चिल्लरगे यांच्या शितल जलतरण तलावात बुडून मयूर राठोड चा मृत्यू 👉 100रू प्रवेश फी, सुविधा 0% 👉 जलतरण तलाव मालक शिवशंकर प्रभूअप्पा चिल्लरगे, वेवस्थापक शिवकुमार रमेश चाकूरे यांच्यावर कार्यवाही करा:- विजय कुमार राठोड मयत मुलाचे वडील 👉 जीव रक्षक सुविधा नाही, फक्त पैसे काढण्याचा धंदा 👉 या जलतरण तलावास शासनाची मान्यता आहे? जल शुध्दीकरण कसे आहे, पाण्याचा शुद्धतेचा अहवाल आहे? सर्वांत महत्त्वाचे दररोज 500 जन पोहण्यासाठी येतात प्रत्येकाचे 100 रू म्हणजे दररोज 50,000(पन्नास हजार रु) महिन्याचे 15 लाख तर वर्षाचे एक कोटी ऐंशी लाख रुपये याचा ही तपास आयकर विभाग करणार ? 👉 येथे असाच प्रकार पहले ही घडल्याची चर्चा ? 👉 जलतरण तलाव मालकावर व वेवस्थापकावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल होणार? उदगीर:- येथील रिंग रोड वर चिल्लरगे यांचे हॉटेल शीतल व शितल जलतरण तलाव असून येथे दररोज 400 ते 500 जन पोहण्यासाठी येतात ,प्रत्येक व्यक्ती कडून तासी 100 रुपये फीस आकारली जाते,आज बुधवारी दुपारी 1=30 च्या दरम्यान विध्यावर्धनी शाळेतील शिक्षक विजयकुमार राठोड हे आपल्या कुटुंबासह मयूर मुलास सुट्टया असल्याने पोहण्यासाठी घेऊन गेले होते,त्यांनी 500 रू भरून 5 जनाचा परवाना घेऊन गेले असताना मुलगा मयूर पोहण्यासाठी जलतरण तलावात उतरला,बाकी सर्व गप्पा मारत बाजूस बसले थोड्या वेळाने मयूर ला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला, तेथे जीवरक्षक सुरक्षा साधन नसल्याने तो बुडाला पण तेथे पोहनाऱ्या अन्य कोणास ही तो बुडत असल्याचे समजले नाही नंतर लक्षात येताच त्यास बाहेर काढले पण वेळ झाला,त्यास त्वरीत खाजगी रुग्णालयात नेण्यात आले तेथे तो मृत असल्याने त्यास सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मयूर च्या वडिलांनी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक पवार यांच्या कडे दिलेल्या जवाबात मयूर चा मृत्यू जलतरण तलाव मालक शिवशंकर प्रभूअप्पा चिल्लरगे वेवस्थापाक शिवकुमार रमेश चाकुरे हेच जबाबदार असल्याचे म्हंटले असून आता पोलीस कोणावर काय कार्यवाही करतात हे पाहावे लागेल, सोबत आता प्रशासन व आयकर विभाग ही काही कार्यवाही करते का हेही पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी

