मयुरेश राठोड मृत्यू प्रकरणी शितल जलतरण चे मालक व वेवस्थापाकावर गुन्हा दाखल उदगीर:- येथील शितल जलतरण तलावात काल 17/04/2024 रोजी दुपारी मयुरेश विजयकुमार राठोड (16) पोहण्यास गेला असता त्याचा जलतरण तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने, तेथे जीव सौरक्षक साधन नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, मयूर चे वडील विजयकुमार राठोड यांच्या तक्रारीवरून शितल जलतरण तलावाचें मालक शिवकुमार प्रभूअप्पा चिल्लरगे व वेवस्थापक शिवकुमार रमेश चाकुरें यांच्यावर ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा र जी क्रं 0214/2024 कलम 304 (अ) ने गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
