यूवा नेते श्रीकांत पाटलाचा कांग्रेस प्रवेश उदगीर= उदगीर येथिल यूवा नेते श्रीकांत पाटील यानी लातुर येथे आज लोकनेते अमित विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आज बाभळगाव येथे उदगीर तालुक्यातील सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे काँग्रेस पक्षाचे उदगीर तालुकाध्यक्ष कल्याण पाटील माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे प्रीतीताई भोसले ॲड. पद्माकर उगिले शहराध्यक्ष मंजूरखा पठाण नगरसेवक राजकुमार भालेराव, महबूब शेख मधुकर एकुर्केकर ,संतोष बिरादार, विलास शिंदे,शिवाजी पाटील भाकसखेडकर यांची उपस्थिती होती,मागील काळात श्रीकांत पाटील यांनी ना. संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आता काँगेस मधे प्रवेश केला आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
