परमेश्र्वर कदम साहेब उदगीर कराना पावलो पावली येते तुमची आठवण :- शहरात खुले आमं देह व्यापार, रस्ते व्यापले अतिक्रमणाने,हातगाडे रस्त्यावर, जन सामान्यांना रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागत आहे उदगीर:- सध्या उदगीर शहर व परिसरात अंधेर नगरी चौपट राज चालतं असल्याची प्रचिती सामान्य जनतेस येत असून जनतेला पावलो पावली उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पूर्व पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम यांची आठवण होत आहे उदगीर शहर पोलिस ठाण्याचे पूर्व पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम पोलिस ठाण्यातून बाहेर निघत आहेत अशी जरी वार्ता रस्त्यांवर अली तर रस्त्यावरील अतिक्रमणे धारकाचे धाबे दणाणत होते, हात गाडे रस्त्यावर सोडा बाजू ने ही फिरकत नव्हते,पण निवडणूक काळ म्हणून त्यांची बदली काय झाली अतिक्रमणे धारकांना, हातगाडे वाल्यांना रानच मोकळे झाले, पत्तेवार चौकातील व्यापारी एवढे परेशान आहेत की व्यापारी भाडे देऊन पारेशान आणि दुकाना समोर हात गाडे वाल्याचा कब्जा, मुक्कावार चौकात जायचे म्हंटले तर सामान्य महिलांना कसे जावे लागते याचा विचारच न केलेला बरा, खुले आम् देह व्यापार, अतिक्रमणाचा विळखा याने सामान्य माणसाला रस्त्यावरून फिरणे अवघड असून प्रशासनाच्या डोळे झाक भूमिकेने ऐतिहासिक उदगीर शहराचे नाव खराब होत असून ही सत्ताधारी किंवा विरोधक काहीच बोलत नसल्याने पावलो पावली कदम साहेबाची आठवण उदगीर कराना येत असून आता कोणी तरी कदम साहेब रुपी यावें आणि सामान्य माणसाची समस्या सोडवावी अशी प्रार्थना उदगीर कर उदागिर बाबा ला करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
