उदगीरात कुंटन खाण्यावर धाड 👉 ग्रामीण पोलिस स्टेशन पासून हकेच्या अंतरावर मागील अनेक महिन्या पासून चालु होता कुंटणखाना 👉 मारवाडी कॉलनी च्या पाठीमागे दोन गल्ल्या सोडून हे ठिकाण उदगीर, (जि. लातुर) - ग्रामीण पोलीस ठाण्या पासून हाकेच्या अंतरावर सोमनाथपूर हद्दीतील एका वस्तीतील कुंटनखान्यावर शनिवारी (ता.१३) सायंकाळी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना पकडले आहे. यातील दोन पिडीतेची लातूरच्या महिला सुधारगृहात रवांनगी केली असून सहा जणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामीण पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी सोमनाथपुर हद्दीतील वस्तीमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षकांना मिळाली, काल त्यांनी सापळा रचून सदर वस्तीतील एका घरात सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर धाड टाकली. त्यावेळेस त्यांना चार महिला, चार ग्राहक पुरुष कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आल्याने रंगेहात पकडले. याची सखोल चौकशी केली असता या चार महिलांपैकी दोन महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत देह विक्रीसाठी प्रवृत करण्यात आल्याचे समोर आले. या पिढीत महिलांचा जवाब घेतल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी मुंढे यांच्या फिर्यादीवरुन कुंठणखाना चालवणाऱ्या दोघी सह, विठ्ठल मारोती केंद्रे (वय-३०) रा.तळ्याची वाडी ता. कंधार, विठ्ठल भगवान नरसींगे (वय-३५) रा. निळकंठ, ता. औसा. व दोन अल्पवयीन बालक अशा आठ जणांवर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास देह व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही महिन्या पासून येथे कुंटणखाना चालु होता, हे स्थळ ग्रामीण पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असून इतके दिवस कोणाच्या कृपेने हा कुंटणखाना चालु होता, याचा सुगावा पोलिसांनी लागला नाही ? याचा ही तपास होणे जरुरी दिसते
• श्रीनिवास मदनलाल सोनी