महावितरण ने केला सुधाकर बिरादार यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्कार देऊन सन्मान उदगीर= हंचनाळ ता. देवणी येथील लाईनमन सुधाकर तानाजीराव बिरादार यांचा कामगार दिनी 1 मे रोजी लातूर येथील महावितरणचे मुख्य अभियंता लातूर परिमंडळ सुंदर लटपटे यानी उत्कृष्ट कामगार पुरस्कार देऊन सन्मानित केले, सुधाकर बिरादार हे एक कार्य कुशल लाईनमन असून ते 24 तास जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असतात,त्यांच्या कार्याची दखल घेऊन महावितरणने हा पुरस्कार देऊन सन्मान केला असून, त्यांना पुरस्कार मिळाल्या बद्दल हंचनाळ ग्रामस्थ तथा त्यांच्या मित्रपरिवार तथा सोनी परिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी
