अवैध शितल जलतरण तलाव त्वरित बंद करून मालकावर सक्त कार्यवाही करा= अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिति 👉 कुठलाही वैध परवाना नसताना जलतरण चालउन लोकांच्या मृत्यस कारणीभूत मालकावर त्वरित कारवाई करा 👉 पहले 100 रू तास होते मयूर राठोड च्या मृत्यू पासून 150 रू तास, म्हणे इतके लाख दिले,कोणास दिले त्याचा तपास व्हावा उदगीर= येथील शितल जलतरण तलावात बुडून 16 वर्षीय मयूर राठोड चा मृत्यू जलतरण तलाव मालकाच्या हलगर्जी ने झाला म्हणून दोघांवर ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये 304 अ कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला खरा पण संबंधितांनी लाखो रूपये देऊन पोलिस ठाण्यातून जमानत घेतली खरी पण मृत्यू चां सापळा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शितल जलतरण तलाव परत नव्या जोमाने सुरू करण्यात आलें असून या जलतरण तलावास प्राधिकरणाचा कुठलाच परवाना नाही, येथे जीवरक्षक सुरक्षा साधन नसताना फक्त पैश्याच्या जोरावर शितल जलतरण तलाव चालु केले असून हे जलतरण तलाव त्वरित बंद करून मालकावर सक्त कार्यवाही करावी असे निवेदन अखील भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिति ने मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक,उप विभागीय अधिकारी उदगीर याना दिले असून आता उपविभागीय अधिकारी या जलतरण तलावावर व मालकावर काय कार्यवाही करतात हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी
