डॉ.शिवाजी काळगे 2 लाख मताने निवडून येतील= शिवाजीराव हुडे सभापती कृ. उ. बा. स. उदगीर 👉 भाजपा म्हणजे आता भोक पडलेली नाव,लवकरच बुडणार , बापात ल्योक नाही, लेकात बाप नाही अशी परिस्थिती 👉 शैक्षणिक गाजावाजा आसलेल्या लातूर मतदार संघातून अडाणी नाही उच्य शिक्षित उमेदवार निवडून मतदान करा उदगीर :- लातूर लोकसभा मतदार संघ (अ.जा.) ची निवडणूक अंतिम टप्प्यात असून 7 मे रोजी मतदान होनार असून या निवडणूकीत सर्वांनी मतदान करून डॉ.शिवाजी काळगे याना भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हूडे यानी केले असून त्यांनी भाजपा चे वाभाडे काडत ल्योकात बाप नाही बापा सोबत ल्योकं नाही , भाजपा नुसत्या बूथ प्रमुखाच्या बैठका घेत असून याना गावात जाऊन जनतेस मत मागण्याची लाज वाटत असून, यांच्या नेत्यांना अनेक गावात मतदार पाऊल ही ठेऊ देत नाहीत तर दुसरीकडे डॉ. काळगे यांचे भव्य स्वागत मतदार करून आशिर्वाद देत आहेत याच्याच जोरावर उदगीर विधानसभा मतदार संघातून 50 ते 60 हजार मताची आघाडी मिळेल तर लातूर लोकसभा संघातून 2 लाखा पेक्ष्या जास्त मताने डॉ काळगे निवडून येथील असेही हुडे म्हणाले असून आता घोडा आणि मैदान जवळच असून कोण जनतेच्या पसंदिस उतरून जास्त मताने विजयी होईल हे पहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी
