देशमुखाना जागृती शुगर सभासद दाखवणार इंगा.. बस्वराज रोडगे 👉 शेतकऱ्याच्या 25000 रुपयाचे शेअर्स वर 10 वर्ष मलिदा घेतला, शेतकऱ्याच्या पैश्यावर कारखाना कर्ज मुक्त केला, आता जबरन शेअर्स परत घेउन 500 रू बाँड घेऊन डीपॉझिट होल्डर केले मग हे शेतकऱ्याचे कैवारी कसे:- बस्वराज रोडगे उदगीर:-अमित देशमुख यांना खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर उसाचा एफ आर पी क्विंटल ला 340 रुपये प्रमाणे दिनांक 7/5/ 24 च्या आत देऊन शेतकऱ्याप्रती आपुलकी दाखवावी यंदा ऊस उतारा तेरा आला आहे प्रतिक्विंटल 340 रुपये प्रमाणे प्रति प्रति टन 4420 रुपये कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर 30 दिवसाच्या आत बिल देणे बंधनकारक असते. पण अद्याप दीड महिना झालं कारखाना बंद होऊन आणखीन एफ आर पी प्रमाणे बिल निघालेली नाही .फक्त उचल देण्यात आली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जागृती कारखान्याने शेतकऱ्याकडून 25 हजार रुपये चा शेअर्स बँकेकडून कर्ज घेऊन भरून घेतला होता त्या शेअर्सचे व्याज शेतकऱ्यांनी भरले शेतकरी आणखीन त्या कर्जातून बाहेर निघाला नाही आणि तो शेअर्स शेतकऱ्याकडून 500 रुपयांच्या बॉण्डवर जबरदस्तीने सह्या घेऊन त्यांना डिपॉझिट होल्डर केले. आहेत काही शेतकरी बॉण्ड न देण्याच्या मनस्थितीत होते त्यांना तुमचा ऊस नेणार नाही अशी धमकी दिली आपला ऊस शेतात तसाच राहील या भीतीपोटी शेतकऱ्याने त्यांना पाचशे रुपयांच्या बॉण्ड वर सह्या दिल्या दिलीपराव देशमुखाणि शेतकऱ्याची निरघूण हत्या केली आहे . कारखान्यावरील 11000 शेअर्स होल्डर चे 500 रुपये प्रमाणे शेतकऱ्याला खर्च करायला लावून एकंदरीत 55,00,000 रुपयांना शेतकऱ्याला खड्ड्यात घातला आणि तुमच्या स्वार्थापायई आपण त्यांना डिपॉझिटर केलात कारखाना तर शेतकऱ्यांच्या शेअर वर उभा केलात. देशात सर्वात मोठी फसवेगिरी जागृती कारखान्याने केली आहे . ही गोष्ट या कारखान्याचे शेर होल्डर जनता कदाचित विसरणार नाही. त्या सर्व शेतकऱ्यांचे 500 रुपये त्यांना करायला लावलेला खर्च परत द्यावे आणि त्यांना पूर्वीप्रमाणे शेअर होल्डर कायम ठेवावे तरच तुम्ही जनतेला मत मागण्याच्या लायकीचे राहाल अन्यथा तुम्हाला जनता मत देणार नाही. साखरेला भरपूर भाव असताना शेतकऱ्याचे बिल का देत नाहीत ? तुरीला भरपूर भाव आहे हरभऱ्याला भरपूर भाव आहे ते का सांगत नाहीत सोयाबीनचा भाव हा जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असतो सोयाबीन हे सर्व देशांमध्ये कमी भावाने विक्री होत आहे पण तुम्ही धुळफेकरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जबाबदार धरत आहात असा कुटील डाव रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करत शेतकऱ्यांना देशोधडीस लावत आहात. दिशाभूल करणे थांबवा आता शेतकऱ्याला फसवणाऱ्या काँग्रेसला धडा शिकवणे गरजेचे आहे, शेतकऱ्यांनी भाजपाला साथ द्यावी असेआवाहन त्यांनी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
