विद्यार्थ्याची फिस घेऊंन प्राध्यापक फरार 👉देवानीच्या विवेकवर्धिनी महाविद्यालयात Ycmou चे प्रवेश प्रक्रियेसाठी 80 विद्यार्थ्यांचे शुल्क घेऊन प्राध्यापक महादेव बीजापुर फरार- ABVP चे ठिय्या आंदोलन. उदगीर- देवणी येथील विवेकवर्धिनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक चे शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या BA, BCOM च्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक महादेव बीजापुरे फरार झाला तर महाविद्यालय प्रशासन या घटनेवर उडवाउडवी चे उत्तर देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेली 75 वर्ष झाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करते. देवणी येथील विवेकवर्धिनी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक चे केंद्र असून शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या BA, BCOM च्या 80 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क घेऊन प्राध्यापक महादेव बीजापुरे फरार झाले आहेत. विद्यार्थ्याचे परिक्षा तोंडावर आली असून महाविद्यालय प्रशासन या घटनेची आम्हाला काहीही माहिती नाही यावर उडवाउडवी चे उत्तर देत असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) वतीने आंदोलन करण्यात आले व सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क परत करावे आणि दोषी प्राध्यापकांवर त्वरित कार्यवाही करुन निलंबन करण्यात यावे अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाला कऱण्यात आली. यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने सर्व मागण्या मान्य करुन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे हमीपत्र देण्यात आले. यावेळी अभाविप लातूर विभाग संयोजक विशाल स्वामी, लातूर महानगर मंत्री सुशांत एकुर्गे, अक्षय स्वामी, अभिषेक स्वामी, ओमकार पोतदार, अविनाश चेपटे, रोहित कांबळे सह अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती विशाल स्वामी यानी दिली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
