नळेगाव उदगीर रस्त्यावरील पूल गेला वाहून,प्रशासनाकडून पर्यायी रस्ता वापरण्याचे आवाहन उदगीर:- लातूर- उदगीर मार्गावरील नळेगाव येथे पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सदर मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्याचे चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांनी कळविले आहे. अहमदपूर उपविभागीय महसूल अधिकारी मंजुषा लटपटे आणि चाकूरचे तहसीलदार श्री. जाधव यांनी पुलाची पाहणी करून तातडीने दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. *पर्यायी वाहतुकीसाठी मार्ग* लातूर - उदगीरला मार्गावरील वाहतुकीसाठी 1)लातूर-चाकूर-उजळंब-कबणसांगवी -उदगीर रस्ता- मार्गे उदगीर (येरोळमोड जवळ). 2) लातूर-चाकूर -उजळंब- रोहिना -हेर कुमठा -तोंडारमार्गे उदगीर 3) लातूर-लातूर रोड -सावरगाव -भाटसांगवी- अंजनसोंडा- उदगीर. यासोबत शिरूर अनंतपाळमार्गेही लातूर ते उदगीर वाहतूक सुरू आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी