विदर्भ चेंबरच्या कार्यकारिणीची अविरोध निवड 👉 सलग दुसऱ्यांदा निकेश गुप्ता अध्यक्षपदी बिनविरोध उदगीर:-शतकोत्तर वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ची सन 2024-26 साठी 31 सदस्य असणाऱ्या कार्यकारणीची अविरोध निवड करण्यात आली. यात वर्तमान अध्यक्ष निकेश गुप्ता यांचीअविरोध फेरनिवड करण्यात आली. चेंबरच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा बहुमान निकेश गुप्ता यांना मिळाला. यापूर्वी हा मान चेंबरचे माजी अध्यक्ष अशोक गुप्ता, अशोक दालमिया, बसंत बाछूका ना मिळाला होता.खंडेलवाल भवनात नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक आमसभेत मान्यवरांच्या उपस्थितीत चेंबरच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.या नूतन कार्यकारणीत अध्यक्ष निकेश गुप्ता, वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ रुहाटीया,कनिष्ठ उपाध्यक्ष निखिल अग्रवाल, सचिव निरव वोरा, सहसचिव किरीट मंत्री, कोषाध्यक्ष किशोर बाछुका कामकाज बघणार आहेत.तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून आशिष चंदाराणा, एड. सुभाषसिह ठाकूर, सलीमभाई डोडिया, चंचल भाटी, मनीष केडिया, राजकुमार राजपाल, योगेश अग्रवाल, कृष्णा शर्मा, निलेश अग्रवाल, आशिष अमीन, महेश मुंदडा, राजीव शर्मा, सज्जन अग्रवाल,संतोष छाजेड,राहुल मित्तल, शैलेंद्र कागलीवाल, राहुल गोयनका,आशुतोष वर्मा, सौ दिपाली देशपांडे, गुलशन कृपलानी, हरीश लाखानी, शांतीलाल भाला, सौ रजनी महल्ले,दिलीप खत्री, कमल खंडेलवाल आदींची निवड करण्यात आली.निवडणूक अधिकारी म्हणून निरंजन अग्रवाल, रमाकांत खंडेलवाल, सीए प्रवीण बाहेती यांनी कामकाज बघितले. आपल्या अविरोध निवडीवर नूतन अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी चेंबरच्या समस्त पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानलेत.व्यापार व उद्योजकांच्या अडीअडचणी शासनास अवगत करून समस्या सोडवण्यासाठी आपण पाठपुरावा करू तसेच या कार्यकाळात वोकल फार लोकल, यशस्वी उद्योगासोबत चहा चर्चा, युवा उद्योजकासाठी औद्योगिक भेट व व्यापारी व उद्योजकाची अध्यावत डायरेक्टरी प्रकाशित करने आदी रचनात्मक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी गुप्ता यांचे मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांना शुभेच्छा बहाल केल्यात. नूतन कार्यकारणीचे व्यापार,उद्योग जगतासह सोनी परिवार उदगीर ने अभिनंदन केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
