*पावसामुळे रद्द २३ जूनची भरती प्रक्रिया २५ जून रोजी होणार* उदगीर:- लातूर जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई यांच्या रिक्त पदासाठी पोलीस भरती प्रक्रिया दिनांक १९ जून पासून पोलीस मुख्यालय मैदान बाबळगाव लातूर येथे सुरू आहे. दिनांक २३ जून रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करिता ८०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. परंतु पावसामुळे भरती मैदानावर पाणी साचल्याने मैदानाचे निरीक्षण केले असता मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्या चे निदर्शनास आल्याने आजची पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. दिनांक २३ जून रोजी भरती प्रक्रियेसाठी बोलविलेले उमेदवार यांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक २५ जून रोजी घेण्यात येणार आहे. तरी दिनांक २३ जून रोजी बोलविण्यात आलेले उमेदवार यांनी दिनांक २५ जून रोजी सकाळी ठीक ०४:०० वाजता पोलीस मुख्यालय मैदान बाबळगाव येथे हजर राहणे बाबत पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर यांचे कडून आवाहन करण्यात आले आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
