काँग्रेस पक्षाच्या खच्चीकरण्यासाठी बाजार समितीत हस्तक्षेप -- सभापती शिवाजीराव हुडे उदगीर:- उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी दिलीपराव देशमुख आणि काँग्रेस पक्षाचे नेते माजी पालकमंत्री आ. अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होने बाकी आहेत. नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका होणे बाकी आहेत. सध्या प्रशासकीय कार्यकाल चालू आहे. मात्र बाजार समितीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असून लोकाभिमुख कारभार चालू आहे. लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीने अनेक लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या. त्या योजनांचे ते केवळ साक्षीदारच नव्हे तर आईसाहेब वैशालीताई देशमुख यांच्याच हस्ते बालिका बचाव योजनेचे उद्घाटन ही झाले होते. उदगीर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या घरी मुली जन्मल्यानंतर या योजनेअंतर्गत मुलींच्या नावाने फिक्स डिपॉझिट ठेवले जात होते. त्याचाही फायदा हजारो शेतकऱ्यांना झाला. मात्र दुर्दैवाने त्या योजनांना खिळ घालण्याचे पाप तत्कालीन भाजपच्या नेत्यांनी केले होते. विशेष म्हणजे तत्कालीन कॅबिनेट मंत्री देखील त्यांच्यासोबत असल्यामुळे या योजनांना खिळ बसली, स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या पुढारी टाईप कार्यकर्त्यांचे समाधान जरी झाले असले तरी जनतेचे मोठे नुकसान झाले. परिणामतः गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, हमाल, मापाडी यांच्या हिताच्या निर्णयाला बाधा आली होती. अनेक वर्ष लोककल्याणकारी योजना पासून लाभार्थी दूर होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकात काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पॅनल प्रचंड बहुमताने विजयी झाले, आणि पुन्हा लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्धार आम्ही घेतला. मात्र काँग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात लोक कल्याणाची कामे केली तर राजकीय दृष्ट्या काँग्रेस सक्षम होईल. असा संकुचित वृत्तीचा विचार करून सत्तेतील लोकांनी बाजार समितीमध्ये हस्तक्षेप करून आमच्या विरोधामध्ये कोर्टकचेऱ्या लावल्या आहेत. नुकताच जिल्हा उपनिबंधिकाचा निकाल आला आहे. त्यामध्ये माझ्यासहित इतर चौघांना अपात्र ठरवले आहे. या संदर्भात आपण कायदेशीर लढा लढणारच आहोत. लोककल्याणाची कामे करत असताना कोणी जर मुद्दाम हस्तक्षेप करावा म्हणून अडथळे आणत असेल तर, जनतेच्या हिताचा विचार करून तसेच लोककल्याणकारी योजना राबवण्याची हमी आम्ही मतदारांना दिली आहे, त्याची पूर्तता करण्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षमपणे कृषी उत्पन्न बाजार समिती चालवून दाखवेल. असा आपल्याला विश्वास आहे. असे विचार प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी व्यक्त केले आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांचा विमा असेल, हमाल, मापारी यांचा विमा असेल, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घेतली जाणारी शिबिरे असतील, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी घेतली जाणारी शिबिर असतील, शेतकऱ्यांचा माल योग्य हमीभाव प्राप्त होईपर्यंत साठवून ठेवण्यासाठी शेतमाल तारण योजना असेल, अशा एक ना अनेक योजना आम्ही कृतिशीलपणे राबवून दाखवणार आहोत, राबवत आहोत. मात्र सत्ताधाऱ्यांना हे सहन होत नाही. त्यामुळे अडथळ्याची शर्यत आमच्या पाठीमागे लावून एका अर्थाने लोककल्याणाची कामे करण्याला ते रोखत आहेत, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्र हे लोक कल्याणकारी राज्य आहे, असे आपण म्हणतो. मात्र राज्यकर्त्यांनी जनतेचे हित विचारात घेण्याऐवजी पक्षाचे हित विचारात घेऊन कुटनीती चालवली आहे. असे असले तरी देखील आम्ही कितीही विरोध झाला तरी दुप्पट जोमाने कामे करून दाखवू. असाही विश्वास याप्रसंगी शिवाजीराव हुडे यांनी बोलून दाखवला आहे.
Popular posts
श्री शिवाजीराव हुडे आज होणार सभापती पदी विराजमान उदगीर= उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी आज विराजमान होणार असून त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्या नंतर त्यांच्या संचालक पदावर शिक्कामोर्तब झाला असून ते आज परत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी विराजमान होत असल्याने अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
Image
नेते बापूराव राठोड वर गुन्हा दाखल होताच ते फरार ? उदगीर : बंजारा समाजाचे कथित नेते तथा लातूर जिल्हा परिषदेचे भाजपाचे माजी सभापती बापूराव राठोड यांनी मागासवर्गीय ७० विद्यार्थ्यांच्या बनावट कागदपत्रा आधारे सरकारला १४ लाख ४० हजार ४४० रुपयांना लुटले. हा भयानक प्रकार उघड होताच उदगीरचे नायब तहसीलदार विलास नामदेव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ४२०, ४६४, ४६७, ४६८, ४७१ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून बाबुराव शंकरराव राठोड हे गुन्हा दाखल होतात फरार झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
Image
तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान उदगीर= तालुका क्रीडा संकुल आता तालुका क्रीडा संकुल दसरा मैदान, सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मागणीस यश,पूर्व कॅबिनेट मंत्री तथा आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन
Image
लाईनमन च्या मनमानी कारभाराने हंचनाळ गावात पावसाळ्यात पाणी टंचाई! उदगीर:- देवणी तालुक्यातील हंचनाळ गावात भर पावसाळ्यात ग्रामस्थांना लाईनमन च्या मनमानी कारभारा मुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या कडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत
Image
पत्रकारावर कोणीही दबाव घालता कामा नये अन्यथा त्यांना त्याचे फळ भोगावे लागेल = पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव उदगीर= मागील काही दिवसापासून कोणीही आपले काळे कारनामे उघडे होऊ नये म्हणून वेगवेगळे हातगंडे वापरत असून पत्रकार त्यांना भीक न घालता ते उघडे करत असल्याने हे लुटारू लोक पत्रकारांना येन केन प्रकारे दबाव घालण्याचा प्रकार करत असून पत्रकार त्यांना पुरून उरतील त्यांचे सगळे कारनामे उघडे पाडतील ,पत्रकाराकडे कोणीही कुठलाही जहागिरदार असला तरी त्याचा दबावास पत्रकार कधीच भीक घालणार नाहीत, काळे कारनामे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की आपले घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती समन्वयक अर्जुन जाधव यांनी उदगीर समाचार सोबत बोलताना म्हणाले की उदगीर शहरातील काही लोक आपले काळे कारनामे उघड होऊ नये म्हणून ते पत्रकारांना वेठीस धरत आहेत,पत्रकारांना नोटीस पाठवणे, गुंडाकडून धमक्या देणे असे प्रकार करत असून त्यांनी ध्यानात ठेवावे की आपल्या काळया करणाऱ्यामाचा पलिता आमच्याकडे आहे,ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी पत्रकाराच्या घरावर दगड घालण्याचे प्रकार करू नयेत,पत्रकार अशा बाबी खपून घेणार नाही,कोणीही आपले काळे कारनामे झाकण्यासाठी पत्रकारावर खोटे आरोप करून दबाव निर्माण करू नये अन्यथा त्यांना पुन्हा पस्तावन्याशिवाय कुठलाच मार्ग राहणार नाही,पत्रकाराची एकजूट ही मधमाश्यांच्या सारखी असून पत्रकार हा आग्या म्हवाळ आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे आणि पत्रकाराच्या नादी लागू नये अन्यथा त्यांना याचे प्रायश्चित भोगावे लागेल असे मत अर्जुन जाधव यांनी व्यक्त केले आहे
Image