जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा उदगीर चे शाखाधिकारी नानासाहेब देशपांडे यांचा सत्कार संपन्न उदगीर:- बँकिंग क्षेत्रात ग्राहक हेच दैवत समजून सतत कार्यमग्न असणारे, एक आदर्श व निःस्वार्थ व्यक्तिमत्व नानासाहेब देशपांडे यांची त्यांच्या कार्याची दखल घेऊन सुप्रसिद्ध अशा जनता सहकारी बँक पुणे , शाखा उदगीरच्या शाखाधिकारी पदी निवड करण्यात आली, या बँकेच्या संचालक मंडळाने नानासाहेब देशपांडे यांच्या मागील जवळपास 10 वर्षातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन ही निवड केली आहे.त्यांना यापूर्वीही उत्कृष्ट कार्याबद्दल बँकेच्या वतीने अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे.त्यांच्या या निवडीबद्दल इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर गुंडप्पा पटणे यांनी नानासाहेब देशपांडे यांचा शाल, गुलदस्ता, क्लासेसचा पॅड व पेन देऊन यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
