उदगीर चे तसिल कार्यालय बनले दलालाचा अड्डा ? 👉 कोणतेही कागद काढायचे असेल तर दलाला मार्फत गेले तरच मिळते कागद ,राशन कार्ड बनवायचे 2000रू,उत्पन्न दाखला काढायचा 1000 रू, निराधार 4000 रू 👉 कोतवाल, तसिल चे कर्मचारीच झाले दलाल उदगीर= उदगीर चे तसील कार्यालयात मागील काही दिवसांपासून अंधेर नगरी चौपट राज चालु असल्याचे दिसत असून, तसील कार्यालयातून कोणास काही कागद पत्र काढायचे असतील तर दलाला शिवाय हे कागद पत्र निघणे अवघड झाले आहे याची प्रचिती येथे येणाऱ्या सर्वाँना होत असून ही अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणी प्रमाणे गपचुप दलाला मार्फत कागद पत्र काढून घेत आहेत, जसे की शाळा कॉलेजे सुरू झाले की पाल्यांना उत्पन्न दाखला लागतो, आता प्रशासनाने लाडकी बहिण योजना चालु केली त्यासाठी राशन कार्ड लागते ,कोणास नॉन क्रिमीलियर तर काहींना कोणत्यातरी योजनेत नाव घालायचे असते हे हेरून येथील कर्मचारीच दलाल होऊन रेशनकार्ड साठी 2000रू,उत्पन्न दाखला 1000रू, निराधार योजनेत नाव घालण्यासाठी 4000 रू ते 6000 रू खुले आम् घेत असून हे घेणे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कृपे शिवाय होत नाही हे लोक बोलत आहेत,जर दलाला मार्फत गेले नाही तर वेबसाईट चे कारण सांगून जे कागद दलाल 10 मिनिटात काढून देतो त्यास 15 दिवस फिरवले जाते मग कंटाळून दलाला शिवाय पर्याय नसल्याने दलाल धारावाच लागतो तसिल कार्यालयातील कोतवाल,कर्मचारीच दलाली करत असल्याची तोंडी तक्रार अनेकांनी तहसीलदार यांच्याकडे केल्याचे समजते पण त्या कोतवालावर,कर्मचाऱ्यावर काहीच कार्यवाही न झाल्याने शेवटी कंटाळून दलालाची पैसे मागत असल्याची ध्वनी फित समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आली असून ज्या कोतवालानी,कर्मचाऱ्यांनी खुले आम् पैसे मागितले आहेत त्यांच्यावर वरिष्ठ काही कार्यवाही करून त्यांना निलंबित करतात का याना पाठीशी घालतात हे पाहावे लागेल
• श्रीनिवास मदनलाल सोनी