राष्ट्रपती द्रोपदी मुर्म 30 जुलै रोजी उदगीरात 👉राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर, मराठवाड्यात नांदेड , उदगीर ला कार्यक्रम उदगीर:- भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेत त्यानंतर पुणे व मराठवाड्यातील नांदेड व उदगीर ला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 28 ते 30 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राष्ट्रपती भेट देणार असून या कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवारांचीही उपस्थिती राहणार आहे. 👉कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं घेणार दर्शन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून 28 ते 30 जुलैदरम्यान राज्यातील विविध ठिकाणांना त्या भेटी देणार असल्याचं समजतंय. 28 जुलैला कोल्हापूरातील महालक्ष्मीच्या मंदिरात त्या दर्शनासाठी जाणार असून त्यानंतर लिज्जत पापड चा गोल्डन जुबली वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला वारणानगर येथे उपस्थित राहणार आहेत. 👉पुण्यातील कार्यक्रमांना राष्ट्रपतींची उपस्थिती दुसऱ्या दिवशी 29 जुलै रोजी पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या पदवीदान समारंभात मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार असून त्याच दिवशी मुंबईत विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 👉 उदगीरात राष्ट्रपतींची उपस्थिती ,कोल्हापूर, पुणे-मुंबईसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड जिल्ह्यांतही येणार आहेत. 30 जुलै रोजी राष्ट्रपती नांदेड येथे गुरुद्वाराचे दर्शन करून त्यानंतर लातूर जिल्हयातील उदगीरला बुद्ध विहाराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस सह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
