मारवाडी समाजात कोणी मयत झाल्यास तसिल समोर करणार अंतीम संस्कार:- श्रीनिवास सोनी उदगीर:- येथील मारवाडी स्मशानभूमी चां तिढा काही केल्या सुटत नसल्याने आता मारवाडी समाजात कोणी मयत झाले तर त्याचे अंतिम संस्कार तसिल समोर करण्यात येईल त्यास प्रशासन जबाबदार राहील असे उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यानी सांगीतले आहे उदगीर येथिल मारवाड़ी समाजास स्मशानभूमि साठी जागा मिळावी म्हणून मागील तीन वर्षा पासून ना.संजय बनसोडे यांच्या कडे मागणी केली होती ती मागणी ग्राह्य धरून तोंडार पाटी येथे 5 गुंटे जागा देण्यात आली खरी पण त्या जागेवर अनेकांनी घरकुल उभे केले असल्याने तेथे मोजणी दिवशीच वाद झाल्याने समाजाने अन्य ठिकाणी जागा देण्याची उपजिल्हाधिकारी साहेबांकडे विनंती केली असता त्यांनी जागा दाखवा मी जागा देतो म्हणून पूर्ण सहकार्य केले ,नगरपालिकेने जागा मोजणी साठी ची फी 57000 रू 21/06/2024 रोजी भूमी अभिलेख कडे भरले पण भूमी अभिलेख कडून प्रत्येक वेळेस नवनवीन कारणे देत आहेत,जो पर्यंत जागा मिळत नाही तो पर्यंत ना बनसोडे यांनी स्मशानभूमी विकासाठी 50 लक्ष रु निधी चे पत्र नियोजन विभागा मार्फत नगर पालिकेस दिले पण जागेचाच प्रश्न मिटत नसल्याने पुढील बाबी काही साध्य होत नसल्याने कंटाळून आता जर पुढे मारवाडी समाजात कोणाचा मृत्यू झाला तर त्याचे अंतिम संस्कार तसील समोर करणार असल्याचे समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांनी सांगितले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी