साइट बंद च्या नावाखाली महा इ सेवा केंद्र चालकाकडून जनतेची दिवसा लूट,लुटिस जबाबदार कोन ? उदगीर:- उदगीर शहरातील काही महा ई सेवा केंद्र चालकास सद्या सुगीचे दिवस आले असून त्यात साईट बंद ने तर यांची चांदीच केल्याचे चित्र दिसत असून,जनतेस हे चालक काही प्रमाणपत्र काढण्यासाठी हजारो रुपय वसूल करून ही साईट बंद म्हणून फिरवत आहेत उदगीर शहरात सद्या सामान्य जनता लुटत असतानाही आम्ही समाजसेवक म्हणून मिरवणारे डोळे मिटून गप्प बसल्याने सद्या महा ई सेवा केंद्र चालकाकडून सद्या तसिल ची साईट बंद आहे म्हणून कोणत्याही प्रमाणपत्रासाठी हजारो रुपये वसूल करत आहेत,हजारो रुपये वसुली करून ही ते जनतेस पंधरा पंधरा दिवस फिरवत असून या लोकांनी 50 रू साठी जर हजारो रुपये घेऊन ही लोकांची हेळसांड केल्याने अनेक विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात आले असून काहीचे तर वरील महाविद्यालयातील प्रवेश रद्द झाल्याने अनेक पालकाची झोप उडाली असून यास जबाबदार कोण कोणास विचारावे हा प्रश्न जनतेस पडला असून , तसिल कार्यालयातील टेबल 1,2,3 वर वजन ठेवल्या शिवाय टेबल वरून कागदपत्र पुढे सरकत नसल्याने ही लूट चालू आहे का हाही प्रश्न जनतेस पडला आहे, तसील कार्यालय जे दलालांनी व्यापले आहे ते कर्तव्यदक्ष उपजिल्हाधिकारी , तहसीलदार साहेबांनी मोडीत काढून जनतेची लूट थांबवावी अशी मागणी सामान्य जनता करत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी