चौबारा वेसचे सद्गुरू उदगीर बाबा महाराज नामकरण करावे:- उदगीर वासियाची मागणी उदगीर:- उदगीर नगरीचे आराध्य दैवत,शहराचे नाव व ओळख ही श्री. सद्गुरू उदगीर बाबा महाराज यांच्यामुळेच आहे म्हणून त्यांच्या नावाने एक महा प्रवेशद्वार असावा, अशी सर्व भाविक भक्तांची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. या इच्छेचा मान करून आपण चौबारा येथील असलेला जुन्या वेसला श्री. सद्गुरू उदगीर बाबा महाराज महा प्रवेशद्वार म्हणुन नामकारण व सुशोभीकरण करण्यासाठी तात्काळ सहकार्य करावे, असे साकडे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे घातले आहे. उदगीरचे ग्रामदैवत श्री. सद्गुरू उदगीर बाबा महाराज यांची जागृत देवस्थान म्हणुन आपल्या भुईकोट किल्ल्यात दर्शनासाठी महाराष्ट्र व सीमा भागातील लाखो भाविक भक्ती-भावाने दर्शनासाठी येत असतात. चौबारा येथील असलेला जुन्या वेसला श्री. सद्गुरू उदगीर बाबा महाराज महा प्रवेशद्वार म्हणुन नामकरण व सुशोभीकरण करावे, अशी मागणी उदगीर बाबा मठ संस्थानचे मठाधीश जयेशगिर गुरू सतिषगिर गोस्वामी यांच्या सह अनेक भक्तांनी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे याना निवेदन देऊन केली आहे.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
