*आगामी काळात ऊर्जा निर्मितीची साधणे बदलतील - डॉ. राम आंब्रे (शास्त्रज्ञ - University Of Denver, Denver, Colorado, USA)* उदगीर: उदयगिरी अकॅडमी येथे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे याचे मार्गदर्शन मिळावे यासाठीच्या आयोजित कार्यक्रमास डॉ.राम आंब्रे, सॉफ्टवेअर इंजिनियर सौ. प्रगती राम आंब्रे आणि नुकताच JEE परीक्षेत 97.38% मिळवून RGIPT, Amethi या कॉलेजला Engineering साठी प्रवेशास पात्र ठरलेला उदयगिरी अकॅडमीचा माजी विद्यार्थी ओम शेरीकर हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना येणार्या काळात ऊर्जा निर्मितीची साधणे बदलतील यावर जगभरातील शास्त्रज्ञ काम करत आहेत, पेट्रोल डिझेलची आवश्यकता कमी होऊन पर्यायी स्त्रोत निर्माण होतील. जसे पाण्याचे पृथक्करण करून हायड्रोजन वेगळे करून हायड्रोजन वायू इंधन म्हणून वापरणे. सौर ऊर्जा यंत्रांची गुणवत्ता वाढवणे व किंमत कमी करणे अश्या संशोधनांच्या प्रयत्नांना यश निश्चित मिळेल असे वक्तव्य सध्या अमेरिकेतील Denver University येथे रसायनशास्त्रज्ञ म्हणुन कार्यरत असलेले उदगीरचे सुपुत्र डॉ. राम आंब्रे म्हणाले. संशोधन क्षेत्रात देशात तसेच परदेशात विद्यार्थ्यांना प्रचंड वाव असल्याचेही त्यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांनी स्वतः चा सर्वांगीण विकास घडवून आणावा तसेच मोठी स्वप्ने पाहून ती सत्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी असे सौ. प्रगती आंब्रे म्हणाल्या. ओम शेरीकरने देखील विद्यार्थ्यांना त्याचा IIT कॉलेज मिळविण्यापर्यंतचा प्रवास सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदयगिरी अकॅडमीचे संचालक मार्गदर्शक प्रा. गोपाळकृष्ण घोडके सर होते तर प्रा.डॉ.धनंजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रा.संतोष पाटील यांनी आभार व्यक्त केले. या प्रसंगी प्रा. ज्योती खिंडे, प्रा. श्रीगण वंगवाड, प्रा. मीना हुरदाळे, प्रा. नंदिनी नीटूरे, प्रा. निवेदिता भंडारे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
