भृष्ट महा ई सेवा केंद्रावर कार्यवाही साठी आज उदगीरात पत्रकाराचे धरणे आंदोलन 👉 तक्रार करून ही अधिकारी मुग गिळून गप्प ? उदगीर:- सां उदगीर नगरी चे संपादक अशोक तोंडारे हे आपल्या बहिनेचे आधार कार्ड मोबाईल ला लिंक करण्यासाठी नप संकुल उदगीर येथील राहुल रक्षाळे यांच्या महा ई सेवा केंद्रावर गेले असता त्यांच्या कडून मोबाईल लिंक साठी 110 रू घेतले परत प्रिंट घेण्यास गेले असता 100 रू ची मागणी केली असता तोंडारे यानी देण्यास नकार देताच तुला काय करायचे ते कर असे पत्रकार मी लई बघितले मी तहीलदार याना प्रती माह एक लाख रु देतो माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही म्हणत त्यांनी हाकलून लावले अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी, उपिल्हाधिकारी याना तोंडारे यानी दिली पण अधिकारी महा ई सेवा केंद्रावर कार्यवाही करणे सोडून तोंडारे यानाच उपदेश देत असल्याचे पाहून सर्व पत्रकारांनी आज स्वातंत्र्य दिनी उपजिल्हाधिकारी कार्यालासमोर सकाळीं 10=30 वाजता धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्र दिले पण अधिकारी भ्रष्ट महा ई सेवा केंद्रास अभय देत असल्याने आज पत्रकार धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्र प्रशासनास दिले असून त्या निवेदनावर 28 पत्रकाराच्या सह्या आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी

