32 वर्षीय महिलेचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी एका विरुद्ध गुन्हा दाखल उदगीर =शहरातील हरकरे नगर येथे एका 32 वर्षीय महिलेचा घरासमोर हात ओढून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि.27ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास शहरातील हरकरे नगर येथील फिर्यादी महिलेच्या घरासमोर आरोपीने घरासमोर येवून आजुबाजुला पाहून फिर्यादीचे उजवे हाताला ओढून फिर्यादीस माझे तुझेवर प्रेम आहे तु मला खुप आवडतेस असे म्हणून फिर्यादीचे मनाला लज्जा उत्पन्न करून त्याने फिर्यादीची छेड काढली व तिला जिवे मारण्याची धमकि दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सरफराज अहमद शेख (वय 28 वर्ष रा. चौबारा ता. उदगीर) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.
• श्रीनिवास मदनलाल सोनी